Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar: गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकारणात शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातही घडामोडी दिसून आल्या. अजित पवार यांनी शरद पवार यांना धक्का देत भाजप-शिंदे गटासोबत हातमिळवणी केली. मूळ पक्ष नाव आणि चिन्ह अजित पवारांच्या वाट्याला आल्यानंतर आता शरद पवार गटाला नवीन पक्ष नाव आणि काल नुकतेच नवीन पक्ष चिन्ह मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने “तुतारी वाजवणारा माणूस” हे नवीन पक्ष चिन्ह दिले आहे. आता या निवडणूक चिन्हाचे लाँचिंग करण्यासाठी शरद पवार गटाच्या वतीने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रायगडावर निवडणूक चिन्हाचे लाँचिंग करण्यात येणार आहे. या लाॅंचिंग सोहळ्याला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांची उपस्थितीत असणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार –
उद्या (दि. 24) रायगडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे. या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला देखील शरद पवार गट सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे.
“आता अवघा देश होणार दंग,आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या साथीने फुंकलं जाणार विकासाचं रणशिंग!
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ला मिळालेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्ष चिन्हाचा अनावरण सोहळा उद्या, दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आला… pic.twitter.com/y9tsdvBVSZ— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 23, 2024
आता अवघा देश होणार दंग –
“आता अवघा देश होणार दंग,आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या साथीने फुंकलं जाणार विकासाचं रणशिंग!
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ला मिळालेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्ष चिन्हाचा अनावरण सोहळा उद्या, दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. चला, छत्रपती शिवरायांच्या साथीने तुतारीचा नाद दाही दिशा घुमवूया!, असे ‘राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ या अधिकृ हॅंडल एक्स या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर लिहित सोबत एक व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे.