IND vs ENG Test 2024 Day-1 Highlights : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना शुक्रवारपासून सुरू झाला. हा सामना रांचीमध्ये खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 7 विकेट्स गमावत 302 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. सध्या ऑली रॉबिन्सन 31 धावांवर तर जो रूट 106 धावांवर नाबाद आहे. दोघांमध्ये 57 धावांची भागीदारी झाली आहे. रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 31 वे शतक झळकावले. त्याने ऑली रॉबिन्सनसह इंग्लंडचा डाव सांभाळला आहे.
Stumps on the opening day in Ranchi!
2⃣ wickets in the final session for #TeamIndia as England move to 302/7
Scorecard ▶️ https://t.co/FUbQ3MhXfH#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/zno8LN6XAI
— BCCI (@BCCI) February 23, 2024
आज पहिले सत्र भारताच्या नावावर होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. आकाश दीपच्या तीन विकेट्सने इंग्लंडची आघाडीची फळी उखडून टाकली होती. त्याने बेन डकेट (11), ऑली पोप (0) आणि जॅक क्रोली (42) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर आकाशने कहर केल्यावर फिरकीपटूंनी कमाल केली. अश्विनने जॉनी बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये तर रवींद्र जडेजाने बेन स्टोक्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवून इंग्लंडचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. बेअरस्टोला 38 तर स्टोक्सला 3 धावा करता आल्या. लंचपर्यंत पहिल्या सत्रात इंग्लंडने पाच विकेट गमावून 112 धावा केल्या होत्या.
यानंतर दुसऱ्या सत्रात म्हणजेच चहापानाच्या वेळेपर्यंत जो रूट आणि बेन फॉक्स यांनी एकही विकेट पडू दिली नाही. त्या सत्रात दोघांनी मिळून 86 धावा जोडल्या.
तिसऱ्या सत्रानंतर म्हणजेच चहाच्या वेळेनंतर सिराजने टीम इंडियाचे सामन्यात पुनरागमन केले. त्याने इंग्लंडला सहावा धक्का देत रूट आणि फॉक्सची 113 धावांची भागीदारी मोडली. फॉक्सचे अर्धशतक हुकले. तो 47 धावा करून सिराजच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याचवेळी टॉम हार्टले 13 धावा करून सिराजच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. तिसऱ्या सत्रात इंग्लंडने 29 षटकांत दोन गडी गमावून 104 धावा केल्या.
दरम्यान, भारतीय गोलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर आकाश दीपने पदार्पणाच्या कसोटीत उत्कृष्ट गोलंदाजी केली. आकाश दीपने इंग्लंडच्या टॉप-3 फलंदाजांना आपले बळी बनवले. भारताकडून आतापर्यंत आकाशने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी सिराजला दोन विकेट मिळाल्या. रवींद्र जडेजा आणि अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.