Shambhuraj Desai | Lok Sabha Election 2024 : खासदारकीची उमेदवारी न मिळाल्याने आमच्या नेत्यांमध्ये कोणतेही रुसवे फुगवे नाहीत, कारण आमच्या पक्षात त्यांचा मानसन्मान कायम आहे, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हंटले आहे. याशिवाय संजय निरुपम यांना चर्चा करायची असल्यास वर्षाची दारे सर्वांसाठी खुली आहेत असे सूचक विधानही त्यांनी केले आहे. । Shambhuraj Desai
जागावाटपामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या खासदारांचे तिकीट कापण्यात आले. यावरून या खासदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. यवतमाळ – वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यात आली असून,
त्यांच्या जागी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. राजू पारवे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कृपाल तुमाने यांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली. यावरूनच नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत बोलतांना देसाई म्हणाले की, पाच नव्हे तर दोनच खासदारांचे तिकीट कापण्यात आले. त्यात भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचा समावेश आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी या दोघांशीही अनेक वेळा चर्चा केली.
त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळालेली नसली तरी पक्षात त्यांना असलेला मान सन्मान कायम आहे. ते पदावर नाहीत म्हणून त्यांचा पक्षात त्यांना असलेला मान कुठेही कमी होणार नाही, असे देसाई म्हणाले. । Shambhuraj Desai | Lok Sabha Election 2024