मुंबई – अखेर शाहरुखची लेक सुहाना खान सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर सुहाना पदार्पण करत असलेल्या ‘द आर्चीज’ या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. शाहरुखच्या लेकीचा हा सिनेमा बॉलिवूडमधील टॅलेंटेड व्यक्तिमत्व असलेल्या झोया अख्तरने दिग्दर्शित केला आहे.
‘द आर्चीज’चे पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. यामध्ये सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा व्यतिरिक्त, पोस्टरमध्ये अनेक स्टार किड्स देखील आहेत या सर्व यंग स्टार कास्टमुळे ‘द आर्चीज’ची संपूर्ण बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
यापूर्वी देखील सुहाना खान तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चांगलीच चर्चेत होती. आता स्वतः सुहानाने ‘द आर्चीज’चे पोस्टर शेअर करून आपल्या बॉलिवूड एंट्रीवर शिक्कामोर्तब केलं आहे. पोस्टरमधील या सर्व स्टार किड्सच्या लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. त्याची कथा टीनएजवर मुलांवरील आधारित आहे. जी काही मित्रांभोवती फिरते.
View this post on Instagram
आर्चीजमधून दिवंगत श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची धाकटी मुलगी तसेच अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर ही देखील बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. याशिवाय अमिताभ आणि जया बच्चन यांचा नातू आणि श्वेता बच्चन – निखिल नंदा यांचा मुलगा अगस्त्य नंदा देखील झोयाच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.