मुंबई – अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपट ‘गदर: एक प्रेम कथा’ 2001 साली प्रदर्शित झाला होता आणि तो सुपर डुपर हिट ठरला होता. या चित्रपटात सकीना आणि तारा सिंग यांच्या प्रेमकथेने प्रेक्षकांच्या मनाला खूप स्पर्श केला.
नुकताच हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशात चाहत्यांना ट्रीट देताना निर्मात्यांनी 2023 च्या मोस्ट अवेटेड चित्रपट ‘गदर 2’ चा टीझर रिलीज केला आहे. ‘गदर 2′ च्या टीझरची सुरुवात एका स्त्री आवाजात बोललेल्या संवादाने होते. ती म्हणते, “दामाद है वो पाकिस्तान का, उसे नारियल दो, टीका लगाओ वरना वो इस बार दहेज में पाकिस्तान ले जाएगा.’
“तो पाकिस्तानचा जावई आहे, त्याला नारळ द्या, टीका लावा त्याला नाहीतर यावेळी तो पाकिस्तान हुंडात घेऊन जाईल’. यानंतर सनी देओलची लाहोरमध्ये धमाकेदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे.
टीझरमध्ये यावेळी सनी देओल हातपंपाच्या ऐवजी मोठं गाडीचं चाक घेऊन रागाच्या भरात ते फिरवत शत्रूंचा नाश करताना दिसत आहे. यानंतर पडद्यावर तारा सिंह इज बॅक असे लिहिले आहे.” दरम्यान अभिनेता सनी देओल म्हणाला, “गदर 2 त्याच्या पहिल्या भागाचा वारसा पुढे नेत आहे. भारतातील सर्वात प्रिय कौटुंबिक चित्रपटांपैकी एक परत आणण्यात सक्षम असणे हा एक आशीर्वाद आहे. जग पुन्हा तारा आणि सकीनाचे स्वागत खुल्या मनाने करेल अशी आशा आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.