मुंबई – शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. अनेकदा सुहानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. मात्र सध्या सुहानाच्या एका फॅन पेजवरून पोस्ट केलेल्या फोटोची जोरदार चर्चा आहे. सुहानाचा इतका बोल्ड अंदाज कदाचितच यापूर्वी चाहत्यांना पाहायला मिळालेला असेल.
बॉलिवूडमध्ये सध्या सक्रिय नसली तरी सुहाना अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये दिसून येते. त्यामुळे ती सतत चर्चेत देखील असते. शिवाय स्टार कीड असल्यामुळे सुहाना लाइमलाईटमध्ये असणं साहजिक आहे. मात्र आता सुहाना चर्चेत आली आहे ते तिचा एक बोल्ड फोटो व्हायरल झाल्यामुळे. या फोटोमध्ये चेहरा जरी दिसत नसला तरी अनेकांनी दावा केला आहे कि ही सुहानाच आहे.
सुहानाच्या एका फॅन पेजने ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. यामध्ये तिचे केस बांधलेले असून ती समुद्रकिनारी बसल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ‘परफ़ेक्ट डे ऑन द बीच’ असे कॅप्शन देखील यावेळी फोटोसाठी देण्यात आले आहे.
It’s a perfect day on the beach. pic.twitter.com/eo13Qe9lKC
— Suhana Khan (@BeingSuhanaKhan) April 27, 2023
लोक या पोस्टवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. हा फोटो कुठला आहे हे बहुतांश लोक कमेंट्समध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.सुहाना लवकरच अमेरिकन कॉमिक मालिकेवर आधारित झोया अख्तरच्या द आर्चीजमधून भारतीय चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर देखील दिसणार आहेत.