Suhana Khan – झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातून अनेक स्टार किड्स एकत्र डेब्यू करणार आहे. शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान, जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर आणि अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा ‘द आर्चिज’मधून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे.
View this post on Instagram
अशात ट्रेलरआधीच निर्मात्यांनी चित्रपटाची दोन गाणी रिलीज केली होती. ज्याला खूप चांगला प्रतिसादही मिळाला. तर आज ‘द आर्चीज’चा ट्रेलर प्रदर्शित होत आहे.’ ट्रेलरची सुरुवात पोर्तुगीजांपासून गोवा मुक्तीपासून होते. ‘द आर्चीज’चा हा ट्रेलर तुम्हाला 1960 च्या दशकात घेऊन जातो. जिथे तुम्हाला रोमान्स, मैत्री, संगीत आणि खूप मजा बघायला मिळते.
हा चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटगृहाऐवजी ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. चाहत्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर 7 डिसेंबर 2023 पासून नेटफ्लिक्सवर अमेरिकन कॉमिक बुक सीरिज ‘द आर्चीज’वर आधारित हा चित्रपट पाहता येणार आहे.
अगस्त्य नंदा ‘आर्ची एंड्रयूज’च्या भूमिकेत असून सुहाना खान ‘वेरोनिका’ लोजच्या भूमिकेत आहे. ‘वेरोनिका’ ही किशोरवयीन आहे जी हायस्कूलमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. ‘वेरोनिकाची बेस्ट फ्रेंड म्हणजे ‘बेटी कूपर’ (खुशी कपूर) जी ‘आर्ची’च्या प्रेमात आहे. मिहीर ‘जुगहेड’च्या भूमिकेत आहे जो आर्चीचा चांगला मित्र आहे. शाहरुख खानच्या लेक सुहानाच्या अभिनयाची चर्चा तर श्रीदेवीची लेक ख़ुशी या दोघींच्या अभिनयाची चर्चा होत आहे.
‘द आर्चीज’चा ट्रेलर मनोरंजक आहे यात शंका नाही. काही लोकांना हे ब्लैक एंड व्हाइट दृश्यविचित्र वाटेल पण कथेनुसार ही स्क्रिप्टची मागणी होती. पण अभिनयाच्या बाबतीत खुशी कपूर आणि सुहाना खानसह अगस्त्यने दमदार अभिनय केल्याचे दिसून येते.