बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानने अलीकडेच फरहान अख्तरवर कौतुकवर्षाव केला आहे. निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी “तुफान’ या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. अलीकडेच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध झाला. या पोस्टरमध्ये फरहान अख्तर हा बॉक्सिंग रिंगणात असलेल्या बॉक्सरच्या भूमिकेत दिसून आला. पोस्टरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढील वर्षी 2 ऑक्टोबर असल्याचे नमूद केले आहे.
या फर्स्ट लूकनंतर शाहरुखने फरहानचे कौतुक केले आहे. यासंदर्भातील ट्विटमध्ये शाहरुख म्हणतो की, क्या बात है! ऑल दी बेस्ट माझ्या मित्रा! हे सर्व पाहून मला खूप आनंद झाला.’ यापूर्वी फरहान अख्तरने या चित्रपटासाठी घेत असलेल्या मेहनतीदरम्यानच्या वर्कआऊटचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. फरहान आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी 2013 मध्ये “भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातून ही जोडी झळकली होती.