हार मानली नाही !

नोरा फतेही तिच्या अफलातून नृत्यकौशल्याबाबत सुप्रसिद्ध आहे. “स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ या नृत्यप्रधान चित्रपटात नोरा महत्त्वाची भूमिका करत आहे. मध्यंतरी, या चित्रपटातील “गर्मी’ हे गाणेरिलीज झाले. या गाण्यामध्ये नोरा भन्नाट नाचताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Pose ✨?? #SD3 @marcepedrozo @anups_

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on


या संपूर्ण चित्रपटात नोरा अशाच प्रकारे उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर करताना दिसते. चित्रपटात नोराचा एक इंट्रोडक्‍ट्री डान्सही आहे. या नृत्याचे चित्रीकरण करण्यासाठी नोराला खूप मेहनत घ्यावी लागली.


याविषयी ती सांगते की, या नृत्याचे चित्रीकरण लंडनमध्ये झाले. मी जवळपास एक महिन्याहून अधिक काळ त्याचा सराव करत होते. परंतु लंडनला जाण्यापूर्वी एक आठवडा कोरियोग्राफी आणि डान्स स्टाईल बदलण्यात आली. साहजिकच त्यामुळे मी खूप नर्व्हस झाले. तशातच रेमो सरांनी मला हा संपूर्ण डान्स सिंगल टेकमध्ये ओके कर असे सांगितले. या नृत्यासाठी हातातून सशक्‍तपणा दाखवायचा होता. माझ्यामध्ये ती स्ट्रेंथ आहे.

 

View this post on Instagram

 

@cultgaia @ayanasilverjewellery @manekaharisinghani @macepedrozo @swapnil_kore_photography

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on


पण दडपणामुळे मला ते सिंगल टेकमध्ये जमले नाही. खूप रिटेक झाले. एखादी स्टेप जरी चुकली तरी तो सीन पुन्हा करावा लागायचा. त्यातच चित्रीकरणादरम्यान माझ्या पाठीला आणि मानेला दुखापत झाली. पण मी हार मानली नाही.


शॉट ओके होईपर्यंत मी फिजिओथेरपीचे सेशन्स घेतले. माझी ही सारी मेहनत पाहून रेमो सर खूप खुश झाले. आजवर एखाद्या अभिनेत्रीने एखादा सीन परफेक्‍ट करण्यासाठी इतके रिटेक घेतलेले मी आजवर पाहिले नाही, अशी कॉम्प्लिमेंट त्यांनी दिली. माझ्यासाठी ती सर्वांत मोठी पोचपावती होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.