निर्माती बनायचं नाहीये!

बॉलीवूडच्या क्षेत्रातील हिट-फ्लॉप अशा दोन्ही श्रेणीतील कलाकारांना सध्या अभिनयबाह्य क्षेत्रात जाण्याचे वेध लागले आहेत. कुणी दिग्दर्शन करतंय, तर कुणी सिनेमॅटोग्राफी; कुणी व्हॉईस ओव्हर देतंय तर काही जण पार्श्‍वगायन करताहेत! चित्रपट निर्मितीच्या क्षेत्राकडेही अनेकांनी आपला मोर्चा वळवला आहे.

बॉलीवूडमधील अनेक नायिका सध्या चित्रपटनिर्मिती करत आहेत. अभिनेत्री विद्या बालनचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूर हादेखील एक निर्माता आहे. अलीकडेच एका कार्यक्रमामध्ये विद्याला “तूही निर्मितीच्या क्षेत्रात येणार आहेस का’ असा प्रश्‍न विचारण्यात आला. यावर तिने तत्काळ त्याला नकार दिला. मला अजिबात निर्माती बनायचं नाहीये. कारण त्यासाठीचा माइंडसेट माझ्यात नाही, असं विद्या सांगते.

माझ्या घरात एक निर्माता आहे तेवढंच पुरे आहे. विद्या सध्या एका नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. लवकरच ती एका वेबसिरीजच्या माध्यमातून माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची जीवनकहाणी घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.