स्टारकिड म्हणून जुनैदला वशिला नाही

स्टारकिडना एकापाठोपाठ एक बॉलीवूडमध्ये लॉंच केले जात असल्यामुळे वशिलेबाजीचा आरोप होणे स्वाभाविक आहे. मात्र मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमिर खानने आपला मुलगा जुनैदसाठी ही वशिलेबाजीची शिडी वापरायचे नाही, असे ठरवले आहे. स्वतः आमीर आपल्या सिनेमाच्या निकषांबाबत किती काटेकोर आहे, हे जगजाहीर आहे. त्याच्या मापदंडांनुसार कामगिरी करून दाखवण्याची क्षमता असल्याचे जुनैदला सिद्ध करता आले नाही. आमीरच्या काटेकोरपणाच्या बाबतीत जुनैद अगदी “रन आऊट’झाला.

“फॉरेस्ट गम्प’ या हॉलीवूडपटाचा हिंदी रिमेक “लाल सिंह चढ्ढा’ साठी जुनैदची निवड करायची चर्चा सुरू होती. त्यासठी जुनैदला काही महिन्यांचे ट्रेनिंगदेखील घ्यायला लागले होते. त्याच्यावर “लाल सिंह चढ्ढा’च्या काही सीनचे शूटिंगदेखील झाले होते. या सीनच्या आधारे त्याचे ऑनस्क्रीन ऍक्‍टिंगचे ऑडिट स्वतः आमीर खानने केले. मात्र तो अपल्या पोराच्या ऍक्‍टिंगबाबत फारसा समाधानी झाला नाही. जुनैदने स्वतःच्या क्षमतेनुसार पार जीव तोडून ऍक्‍टिंग केली. मात्र तो आमिरची पात्रतेची पातळी गाठू शकला नाही.

जुनैदने यापूर्वी अमेरिकन ऍकेडमी ऑफ ड्रामामधून थिएटर केले आहे. त्याने विदेशात जाऊन अभिनयाचा अभ्यासही केला आहे. आमीरच्या “पीके’च्या डायरेक्‍टरला सहाय्यही केले आहे. त्याने “रुबरू रोशनी’च्या प्रमोशनमध्येही योगदान दिले आहे. मात्र ही तयारी लीड रोल साकारायला पुरेशी नाही, असे आमीरचे म्हणणे आहे. “फॉरेस्ट गम्प’ या मूळ हॉलीवूडपटामध्ये टॉम हंक्‍सने ज्या तडफेने काम केले होते, तीच जुनैदमध्ये मिसिंग असल्याचे आमिरचे म्हणणे होते. टॉम हंक्‍सची मॅच्युरिटी जुनैदमध्ये कशी पैदा करायची, हा त्याच्यासमोरचा मोठा प्रश्‍न होता. त्यामुळे हा रोल जुनैदला देण्याऐवजी स्वतःच साकारायचा निर्णय आमिरने घेतला आहे. त्यामुळे या सिनेमाच्या प्रीप्रॉडक्‍शनमध्ये आमिरने नेहमीपेक्षा अधिक वेळ घालवला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.