करिष्मा माधुरीच्या डान्सची जुगलबंदी अविस्मरणीय

बॉलिवूडमध्ये शक्‍यतो कोणी एका कलाकाराबरोबर दुसऱ्याची तुलना करू नये असे म्हणतात. कारण प्रत्येकाचा ऍक्‍टिंगचा पैलू वेगवेगळा असू शकतो. पडद्यावर बऱ्याच वेळेस एकाच सिनेमात दोन स्टार असतील, तर अशी तुलना स्वाभाविकपणे केली जाते. विशेषतः लीड रोल करणाऱ्या नायक, नायिकांमध्ये अशी तुलना होऊ शकते. अशावेळी अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळते. अशीच एक जुगलबंदी शाहरुख, करिष्मा कपूर आणि माधुरी दीक्षितच्या “दिल तो पागल है’मध्ये बघायला मिळाली होती.

“दिल तो पागल है’मध्ये करिष्मा आणि माधुरीच्या डान्सच्या जुगलबंदीचा एक मस्त सिक्‍वेन्स आहे. शाहरुखच्या डान्सिंग ट्रूपमधील करिष्मा अचानक जखमी झाल्यामुळे शो साठी शाहरुख माधुरीची निवड करतो. ते करिष्माला आवडत नाही आणि जखमी असतानाही तिने प्रॅक्‍टीसमध्ये येऊन माधुरीला डान्सला चॅलेंज केले. त्यानंतर या दोघींच्या डान्सची जुगलबंदी अफलातून होती. याचे स्मरण माधुरीने करिष्माच्या 45 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने केले. ट्‌विटरवर करिष्माला शुभेच्छा देताना माधुरीने “दिल तो पागल है’च्या सेटवरची मजा, मस्ती आणि दंगा कसा होता, हे देखील सांगितले आहे. त्यावेळचा आनंद आपल्याला अजूनही आठवतो आहे, असे माधुरीने म्हटले आहे. तिने करिष्माला त्याच आनंदाचा पुनः प्रत्यय मिळावा, अशी शुभेच्छा दिली आहे.

ती होस्ट असलेल्या डान्स रिऍलिटी शोमध्ये सध्या नवनवीन कलाकार येत आहेत. त्यातून नवीन स्टार मिळतील, असे तिला वाटते. बऱ्याच दिवसांनी तिचा “कलंक’ आला होता, पण प्रेक्षकांनी या सिनेमाकडे साफ दुर्लक्ष केले. करण जोहरच्या या सिनेमाला प्रेक्षकांनी सोशल मीडियावरही ट्रोल केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.