मुंबई – बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी त्याचा जवान चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अनेक दाक्षिणात्य चित्रपटातील कलाकार बॉलीवूडमध्ये एंट्री करत असतानाच आता आणखी एक बातमी समोर येत येत आहे. अभिनेता शाहरुख खानसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना स्क्रीन शेअर करणार आहे.
शाहरुख आणि रश्मिका एका जाहिरातीसाठी काम करणार आहेत. ‘प्रभुजी प्युअर फूड’ या अॅडमध्ये हे दोघे एकत्र येणार आहेत. या जाहिरातीचं शूट यशराज फिल्म्सच्या स्टुडिओत पार पडले. यावेळी या दोघांचा फोटो घेण्यात आला. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लवकरच ही जाहिरात प्रदर्शित होणार आहे. परंतु याबाबत अद्याप या दोघांनीही अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही.
Shah Rukh Khan, Rashmika Mandanna come together for an ad; fans elated
Read @ANI Story | https://t.co/up5L2tYFON#SRK #ShahRukhKhan #RashmikaMandanna #Jawan pic.twitter.com/GfXVpvC4H7
— ANI Digital (@ani_digital) August 28, 2023
दरम्यान, शाहरुख आणि रश्मिकाचा हा व्हायरल फोटो सध्या अनेकांच्या पसंतीस पडत आहे. या फोटोवर चाहत्यांच्या लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘बेस्ट सरप्राईज आहे.’ याशिवाय अनेकांनी या दोघांना एकत्र स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हंटले आहे.