शहांनी काश्‍मीरात जाऊन 370 वर बोलावे – कॉंग्रेस

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईतील सभेत काश्‍मीरातील कलम 370 वर भर देत व्याख्यान दिले त्याची कॉंग्रेसने खिल्ली उडवली आहे.

पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात काश्‍मीरच्या कलमाविषयी इतके भर देऊन बोलणे अनाकलनीय आहे, त्यांनी या विषयावर महाराष्ट्रात बोलण्यापेक्षा काश्‍मीरात जाऊन बोलावे असा टोमणाहीं त्यांनी मारला. महाराष्ट्रात कलम 370 नव्हे तर कलम 371 लागू आहे असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीतील प्रचाराचे मुद्दे पुर्ण वेगळे असताना भाजपने मात्र एकदम काश्‍मीरच्या कलम 370चा वापर महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात करण्याची जी रणनिती ठरवली आहे ती कितपत परिणामकारक ठरेल या विषयी अन्य राजकीय निरीक्षकही साशंक आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×