सार्वजनिक आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रीत करावे- उपराष्ट्रपती

नवी दिल्ली: केंद्र व राज्यांनी गुणवत्तापूर्ण सार्वजनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनी आज हैद्राबाद येथे केले.

स्वर्ण भारत ट्रस्टच्या केआयएमएस रुग्णालयातर्फे आयोजित एका नि:शुल्क चिकित्सा शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. चिकित्सा महाविद्यालय तसेच संस्थांनी जवळपासच्या महाविद्यालयांमध्ये जाऊन आजारांना दूर ठेवणे तसेच आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याबाबत जागरुकता अभियान राबवावे. लोक आपल्या आरोग्याकडे व मुलभूत सावधगिरीकडे दूर्लक्ष करतात; कित्येकवेळा आजारांवरील उपचारांसाठी लोक खूप खर्च करतात; हे पाहता त्यापेक्षा आजार होणारच नाहीत याकडे लक्ष द्यायला हवे.

यासाठी जागरूकता महत्वाची आहे. निष्क्रिय जीवनशैली व अनारोग्यकारक आहार सारख्या सवयी आजार आणि रोग वाढविण्यात अग्रेसर आहेत. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी नियमित शारीरीक हालचाली रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी तेलंगणा राज्याचे राज्यपाल डॉ. तमिलिसाई सुन्दरराजन, आंध्रप्रदेशचे माजी मंत्री डॉ. कमिनेनी श्रीनिवास व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here