इंडोनेशियाला भूकंपाचा तीव्र धक्का

जकार्ता: इंडोनेशियामधील याम्देन बेटाला काल भूकंपाचा तीव्र धक्का बसला. हा भूकंप 5.9 रिश्‍टर इतक्‍या तीव्रतेचा होता, असे “युएस जिऑलॉजिकल सर्व्हे’ने म्हटले आहे. संध्याकाळी 7.43 वाजता झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी जकार्ताच्या उत्तर पश्‍चिमेकडील सौम्लाकी येथून 186 किलोमीटर अंतरावर जमिनीखाली 48.5 किलोमीटरवर होता.

या भूकंपामुळे जिवीतहानी अथवा वित्तहानी झाल्याचे कोणतेही वृत्त त्वरित उपलब्ध होऊ शकले नाही. भूकंपाची तीव्रता जास्त असूनही यामुळे त्सुनामी लाटा निर्माण होण्याचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. इंडोनेशियामध्ये सातत्याने भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात.
दोनच दिवसांपूर्वी गुरुवारी इंडोनेशियाच्या पूर्व पश्‍चिमेकडील जावा प्रांतालाही 6.1 रिश्‍टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्र सपाटीखाली 623 किलोमीटरवर होता. मात्र याही भूकंपाच्यावेळी कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. 2 ऑगस्ट रोजी झालेल्या भूकंपामध्ये काही घरांची पडझड झाली होती. त्यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.