Adah Sharma Dance Video| अभिनेत्री अदा शर्माला ‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेक मराठी भाषेतील व्हिडिओ ती शेअर करत असते. नुकतेच अदाने तिच्या आजीसह मराठी गाण्यावरील एक डान्सचा व्हिडिओ इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावरील ‘गुलाबी साडी’ या गाण्याने धुमाकुळ घातला आहे. यावर अदा तिच्या आजीसह थिरकताना पाहायला मिळाली.
अदाने शेअर केलेल्या व्हिडिओत अदाची आजी ‘गुलाबी साडी’ नेसून डान्स करताना दिसत आहे. तर अदा टी-शर्ट आणि शॉट्स घालून भिंतीमागे लपून डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. “ही माझी आजी आहे. ज्याला माहित नाही त्यांच्यासाठी. ती माझी खऱ्या आयुष्यातील हिरो आहे,” असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिले आहे. सध्या तिचा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे. चाहत्यांनी कमेंट करीत अदा आणि आजीच्या डान्सचे कौतुक केले आहे. Adah Sharma Dance Video|
View this post on Instagram
अदा सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी शेअर करताना दिसते. अनेकदा तिने तिच्या आजीचा उल्लेख केला आहे. एकदा तिने तिच्या आजीची साडी नेसली होती. अशातच तिने तिच्या आजीचा व्हिडिओ शेअर केला आहे. Adah Sharma Dance Video|
अदाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, नुकताच तिचा ‘बस्तर- द नक्षल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात तिने आयपीएस अधिकारी नीरजा माधवन ही भूमिका साकारली आहे.
हेही वाचा: