Sara Ali Khan| बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने अल्पावधीत सिनेसृष्टीत मोठे यश संपादन केले आहे. बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. मात्र सारा देखील सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकतीच दिलेल्या एका मुलाखतीमधील तिचे विधान चर्चेत आले आहे. यावेळी तिने ट्रोलिंगसह विविध मुद्यांवर भाष्य केले आहे.
सारा अली खान म्हणाली की, “मी चित्रपटसृष्टीत आहे, माझे काम चित्रपटांमध्ये काम करणे आहे. लोकांना काम आवडले नाही तर मी अडचणीत येईल. जर मी एखाद्या अवॉर्ड शोमध्ये डान्स केला किंवा असे कोणतेही काम केले ज्यासाठी त्यांनी मला जज केले तर मला वाईट वाटेल. माझ्या विनोदी वृत्तीमुळे मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. विनोदी लोकांना स्वाभिमान नसतो का? त्यांनाही गोष्टी वाईट वाटू शकतात,”
पुढे ती म्हणाली, “लोक माझ्या व्यक्तिमत्त्वाविषयी कमेंट्स करत असतील, तर मी दुर्लक्ष करते. मला त्याचा फरक पडत नाही. मी अनेकदा हसत-खेळत सर्वांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते. पण याच गोष्टी अनेकजण नकारात्मकतेने घेतात.”
सारा अली खानच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ती दोन चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सारा ‘ए वतन मेरे वतन’ हा चित्रपटात दिसणार आहे. येत्या 21 मार्चला ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर ‘मेट्रो इन दिनो’ मध्ये ही ती झळकणार आहे.
हेही वाचा:
राशी खन्नाला व्हायचे होते,’IAS अधिकारी’