पुणे – बिबवेवाडी परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा बिबवेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला. येथून दोन महिलांची सुटका करण्यात आली असून दोन दलालांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी राजेश उसगांवकर यांना रासकर पॅलेस तिसरा मजला फलॅट नं.7 बिबवेवाडी येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची खबर मिळाली. त्यानूसार बनावट गि-हाईक पाठवून खातरजमा करुन तेथे छापा टाकला.
छाप्या दरम्यान एकुण दोन महिलांची सुटका करुन त्यांना वेश्या व्यवसाय करावयास
लावणा-या महेंद्र ज्ञानाराम प्रजापती (34, रा.बी- बिबवेवाडी, मुळ गाव सोजत, जि.पाली ) पांडुरंग लक्ष्मण शिंदे (46 रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुध्द विरुध्द पिटा ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपी अटक करण्यात आले. कारवाईत रोख चार हजार रुपये, तीन मोबाईल हॅंडसेट,कंडोमची पाकिटे तसेच इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच या गुन्ह्यातील पिडीत महिलांना रेस्क्यु फाउंडेशन महम्मदवाडी हडपसर येथे संरक्षण कामी ठेवण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त नम्रता पाटील मॅडम, सहा.पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे व पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर, उपनिरीक्षक प्रिया राजगुरु सहायक उप-निरीक्षक दिपक मते, पोलीस अंमलदार श्रीकांत कुलकर्णी, सतिश मोरे, तानाजी सागर, महिला पोलीस शिपाई बागवान,परकाळे यांनी केली आहे.