तूरिन (इटली) : इटलीच्या ‘सिरी ए’ फुटबाॅल लीग सामन्यामध्ये युव्हेन्ट्स संघाने गुरूवारी रोमा संघाचा ३-१ ने पराभव करत विजय नोंदविला.
⚽️ Ronaldo, ⚽️ Bentancur, ⚽️ Bonucci.
La @juventusfc conquista la semifinale di #CoppaItalia. 💪#WeAreCalcio pic.twitter.com/rslemQ6Z23— Lega Serie A (@SerieA) January 22, 2020
युव्हेन्ट्स संघाकडून ख्रिस्तियानो रोनाल्डोने २६ व्या मिनिटाला पहिला, रोड्रिगो बेंटाकुरने ३८ व्या मिनिटाला दुसरा तर लियोनार्डो बोनुकीने (४५+२) मिनिटाला तिसरा गोल केला. रोमा संघाचा एकमेव गोल युव्हेन्ट्सचा गोलरक्षक जियानलुगी बफनच्या आत्मघाती गोलमुळे झाला. (आत्मघाती गोल म्हणजे खेळाडूकडून स्वत:च्याच संघाच्या गोलपोस्टमध्ये चुकीमुळे गोल होणे.)
युव्हेन्ट्सचा मागील पाच सामन्यातील हा पाचवा विजय आहे. युव्हेन्ट्सचा संघ सिरी ए लीगच्या गुणतालिकेत ५१ गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे. त्यांनी २० सामने खेळले असून त्यात त्यांना १६ सामन्यात विजय , ३ सामन्यात ड्रा तर १ सामन्यात पराभव मिळाला आहे. रोमाचा संघ ३८ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.