Selena Gomez : हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सेलेना गोमेझ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मग ते तिचे वैयक्तिक आयुष्य असो वा व्यावसायिक.
सध्या अभिनेत्री तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिने मंगळवारी तिच्या इंस्टाग्रामवर जाहीर केले की ती सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे. एवढेच नाही तर यामागचे कारणही तिने आपल्या पोस्टमध्ये शेअर केले आहे.
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध 6 ऑक्टोबर रोजी सुरू झाले आणि ते अजूनही सुरू आहे. या युद्धात दोन्ही देशांतील हजारो लोक मारले जात असले तरी हे युद्ध थांबत नाहीये. अशात अनेक सिनेतारक आपली मते व्यक्त करत आहेत. कोणी इस्रायलला पाठिंबा देत आहे तर कोणी पॅलेस्टाईनसाठी पुढे येत आहे. अभिनेत्री सेलेना गोमेझ देखील त्यापैकी एक आहे. सेलेना गोमेझने इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर भाष्य केले आहे.
अशात आता इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे,’मी सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे कारण जगात सुरू असलेली दहशत, द्वेष, हिंसा आणि दहशत पाहून माझे हृदय तुटत आहे. आपण सर्व लोकांचे, विशेषत: लहान मुलांचे रक्षण केले पाहिजे आणि हिंसाचार एकदाच थांबवावा. माझे शब्द प्रत्येकासाठी किंवा हॅशटॅगसाठी कधीही पुरेसे नसतील तर मला माफ करा. निष्पाप लोकांना दुखापत होणे मी सहन करू शकत नाही. हेच मला आजारी बनवते. माझी इच्छा आहे की मी जग बदलू शकेन.’
अलीकडेच या सेलेनाबाबत बातमी आली होती की तिने एंगेजमेंट केली आहे. अभिनेत्रीचे नाव काही काळापासून डिक्सी डी’अमेलियोचा माजी प्रियकर नोहा बेकशी जोडले गेले आहे. दरम्यान, ती पॅरिसच्या रस्त्यावर एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली. इतकंच नाही तर तिने तिची एंगेजमेंट रिंगही फ्लॉंट केली होती, त्यानंतर अभिनेत्रीने एंगेजमेंट केल्याची अटकळ बांधली जात आहे.