नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघासमोर समोर दुखापतीचे संकट भारतीय पुरुष क्रिकेट संघाने सध्या मायदेशात न्युझीलंड विरुद्धची कसोटी मालिका जिंकली, सोबतच सलग १४ कसोटी जिंकण्याच्या पराक्रम सुद्धा केला.
आता भारतीय संघ काही दिवसातच आफ्रिकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर कसोटी मालिकेसह एकदिवसीय मालिकेचा समावेश आहे. दरम्यान लवकरच भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. दोन्ही संघादरम्यानच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यास 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
मात्र, भारतीय दुखापतीचे संकट उभे ठाकले आहे. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शुभमन गिल आणि इशांत शर्मा हे खेळाडू जखमी आहेत. या खेळाडूंना दुखापतीमधून सावरण्यासाठी काही आठवडे लागणार असल्याने त्यांना विश्रंती दिली जाण्याची शक्यता आहे.
रवींद्र जडेजा आणि इशांत शर्मा हे दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत झालेल्या दुसर्या कसोटीत खेळू शकले नव्हते. जडेजाला ‘लिगामेंट टियर’ तर इशांतच्या बोटाला दुखापत झाली आहे. जडेजाची दुखापत बरी होण्यासाठी महिने लागतील. जर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली तर जडेजा ‘आयपीएल-2022’च्या आसपास बरा होईल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ पुढील प्रमाणे….
डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कागिसो रबाडा, सारेल आर्वी, ब्यूरन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडन मार्कराम, व्यान मुल्डर, एनरिक नॉर्खिया, कीगन पीटरसन , रासी वॅन डर डुसेन, काइल विरेन, मार्को जेन्सेन, ग्लेंटन स्टरमन, प्रिनेलन सुब्रेन, सिसांडा मॅगाला, रायन रिचेल्टन आणि डुआन ऑलिव्हियर.