पुणे :- पुना क्लब लिमिटेडच्या वतीने आयोजित दहाव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत सेलर्स,जॅग्वार्स या संघांनी अनुक्रमे जेट्स व ऑल स्टार्स संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात सेलर्स संघाने जेट्स संघाचा १ धावेने थरारक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
प्रथम फलंदाजी करताना सेलर्स संघाने ६ षटकात २ बाद ९७ धावा केल्या. याच्या उत्तरात जेट्स संघाला ६ षटकात ७ बाद ९६ धावाच करता आल्या. दुसऱ्या सामन्यात जॅग्वार्स संघाने कपिला परमार ऑल स्टार्स संघाचा ८ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली.
Poona Club Premier League 2024 : जेट्स, फोर ओक्स सेलर्स उपांत्य फेरीत…
कपिला परमार ऑल स्टार्स संघाने पहिल्यांदा खेळताना ६ षटकात २ बाद ७० धावा केल्या. हे आव्हान जॅग्वार्स संघाने ५.४ षटकात बिनबाद ७४ धावा करुन पुर्ण केले.