मुंबई – अभिनेता सनी देओलला कोण ओळखत नाही. गदर,घायल,घातक,अपने,यमला पगला दिवाना असे अनेक दर्जेदार चित्रपट दिल्यामुळे सनी देओल आजही अनेकांनी आवडतो. सनीची हटके स्टाईल आजही अनेकांना आवडते म्ह्णून आजही सनीचे फॅनफॉलोविंग मोठे आहे. नुकताच याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये एक शेतकरी सनीला ‘तुम्ही सेम सनी देओल सारखे दिसता’ असे म्हणताना दिसत आहे.
सध्या राजकारणात सक्रिय असल्यामुळे सनी बड्या स्क्रिनवर फारच कमी वेळा दिसून येतो. तरी आजही सनीचे अनेक चाहते असल्याचे समोर आले आहे. सध्या सनी देओल आपल्या गदर २ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान सनीने एका शेतकऱ्यासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. अहमदनगरमधील हा व्हिडीओ असल्याचे समजते.
या व्हिडिओमध्ये सायंकाळी आपल्या कामासाठी शेतावर चाललेल्या एका काकांना सनी देओल भेटतो आणि त्यांच्याशी गप्पा मारू लागतो. काका त्यांना पाहून ‘तुम्ही सनी देओल सारखे दिसता’ असंही म्हणतात त्यावर मी सनी देओलचं आहे असं अभिनेता सांगतो. त्यावर ते शेतकरी काका एकदम प्रांजळपणे ‘अरे बापरे…’ अशी प्रतिक्रिया देतात. या शेतकरी काकांचा निरगसपणा अभिनेत्याला इतका भावला कि त्याने स्वतःच्या सोशल मिडीआयवर याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
गदर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
अनिल शर्मांच्या अगदी अलीकडच्या सिनेमांनी काही विशेष प्रभाव दाखवला नाही. सध्या अनिल शर्मा आपल्या ‘गदर 2′ वर विशेष कष्ट घेत आहेत. या सिनेमात संपूर्ण देओल फॅमिली एकत्र दिसणार आहे. त्याच्याकडूनही शर्मांना विशेष अपेक्षा आहेत.‘गदर-2’ चित्रपटाचे शूटिंग देखील पूर्ण झालं असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोशल मीडियावर देखील ‘गदर-2’च्या शूटिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.11 ऑगस्ट 2023 रोजी गदर-2 रिलीज होणार आहे अशी माहिती सनीने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये दिली होती.