मुंबई – शिवसेनेत मोठी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्यभर दौरा करणार आहे. त्यामध्ये शिवगर्जना शिवसंकल्प सभा उद्धव ठाकरे घेत आहे. काल 5 मार्चला उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड भागात पहिली जाहीर सभा पडली असून, यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर चांगलाच निशाणा साधल्याचे दिसून आलं. पक्ष आणि चिन्ह दोन्ही गेल्यानंतरची उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा होती. त्यामुळे ते काय? बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलं होत.
दरम्यान, कालच्या उद्धव ठाकरेंच्या सभेतील गर्दीवरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र, आता मुख्यमंत्री शिंदेच्या या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रत्युत्तर दिल्याचं दिसून आलं आहे. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, “उद्धव ठाकरेंच्या सभेत जर राष्ट्रवादीचे लोक असतील तर आनंदच आहे. कारण आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकच भुमिका मांडत आहे आणि या तीन पक्षाची ताकद कालच्या सभेत दिसली’, असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
पुण्यात कसबाचा गड काबीज केल्यानंतर काँग्रेसचे उमदेवार रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी धंगेकरांचा सत्कार केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेच्या गर्दीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.