मुंबई – डिजिटल सेवा देणाऱ्या पेटीएम कंपनीच्या तब्बल 16,600 कोटी रुपयाच्या आयपीओला बाजार नियंत्रक सेबीने हिरवा कंदील दाखविला आहे. या महिन्याच्या अखेरीस या आयपीओ अंतर्गत शेअर गुंतवणूकदारांना खरेदीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर या कंपनीचे बाजारमूल्य 1.5 लाख कोटी रुपये होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आयपीओमधील किंमत पट्टयाचा तपशील कंपनीकडून लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. शक्य तितक्या लवकर हा आयपीओ उपलब्ध करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.