Paytm Payments Bank| रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबत माहिती RBI कडून देण्यात आली होती. यापूर्वी बँकेने 29 फेब्रुवारी ही अंतिम मुदत दिली होती. त्यानंतर 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. RBI च्या निर्देशानुसार 15 मार्च 2024 नंतर पेटीएम पेमेंट्स बँकेवर कोणताही व्यवहार स्वीकारला जाणार नाही. अशा परिस्थितीत, बँकेने ग्राहकांना पेटीएम पेमेंट्स बँकेत असलेली रक्कम इतर कोणत्याही बँक खात्यात हस्तांतरित करण्याचा सल्ला दिला आहे.
पेटीएम पेमेंटवर बंदी घातल्यानंतर कोणत्या सेवा सुरू राहतील आणि कोणत्या सेवा बंद होतील याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. मात्र पेटीएम पेमेंट्स बँकेसंबधित कोणती सेवा चालू राहणार आणि कोणती बंद याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
ही सेवा राहणार बंद
- वापरकर्ते पेटीएम पेमेंट्स बँकेतून त्यांचे खाते, फास्टॅग किंवा वॉलेट टॉप अपचा वापर करू शकणार नाहीत.
- वापरकर्त्यांना पेटीएम पेमेंट्स बँकेवर कोणतेही पेमेंट मिळू शकणार नाही.
- जर वापरकर्त्याला पेटीएम पेमेंट्स बँकेवर पगार किंवा इतर कोणत्याही पैशांचा लाभ मिळत असेल तर त्याला 15 मार्च नंतर हा लाभ मिळणार नाही.
- १५ मार्चनंतर पेटीएम फास्टॅगमधील शिल्लक दुसऱ्या फास्टॅगमध्ये ट्रान्सफर करता येणार नाही.
- UPI किंवा IMPS द्वारे पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात कोणतेही पैसे हस्तांतरित केले जाणार नाहीत.
ही सेवा बंद होणार नाही
- 15 मार्च 2024 नंतर पेटीएमच्या अनेक सेवा बंद केल्या जातील, परंतु वापरकर्ते 15 मार्चनंतरही काही सेवांचा लाभ घेऊ शकतील.
- या सेवांचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्याला पेटीएमवर दुसरे बँक खाते लिंक करावे लागेल. 15 मार्चनंतरही Paytm वर वापरकर्ते कोणत्या सेवांचा लाभ घेऊ शकतात.
- 15 मार्चनंतर, वापरकर्ते पेटीएम वॉलेटमधून पैसे काढू किंवा जमा करू शकतात.
- पेटीएमद्वारे पेमेंट केल्यानंतर, वापरकर्त्यांना कॅशबॅक, रिफंड किंवा रिवॉर्ड यासारखे इतर सर्व फायदे मिळत राहतील.
- 15 मार्चनंतरही जर पेटीएम पेमेंट्स बँकेत रक्कम उपलब्ध असेल तर वापरकर्ता ती रक्कम वापरू शकतो.
- पेटीएम वॉलेटद्वारे व्यापाऱ्याला सहज पेमेंट करता येऊ शकते.
- पेटीएम वापरकर्त्यांकडे वॉलेट बंद करण्याचा किंवा रक्कम दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करण्याचा पर्याय आहे.
- 15 मार्चनंतरही, वापरकर्ते ओटीटी प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व घेण्यासाठी पेटीएम वापरू शकतात. यासाठी वापरकर्त्याचे पेटीएम वॉलेट किंवा बँक खाते लिंक केले पाहिजे.