वॉशिंग्टन : मंगळावर परग्रहवासींचे अस्तीत्व असल्याचे कथन उलगडून सांगितल्याने प्रकाशझोतात आलेले स्कॉट वॉरींग हे त्यांच्या एका विचित्र शोधामुळे चर्चेत आले आहेत. तैवानमध्ये कार्यरत असणाऱ्या वॉरीन यांनी मंगळावर परग्रहवासीयांचे अस्तित्व असल्याचे वेळोवेळी प्रतिपादन केले आहे. आपल्या या सिध्दांताच्या पृष्ठ्यर्थ त्यांनी नासाने मंगळावर टीपलेल्या अनेक विसंगतीपूर्ण छायाचित्रांचा छायाचित्रांचा आधार घेतला आहे.
आपल्या सिध्दांताच्या स्पष्टीकरणासाठी वॉरींग यांनी पुतळ्यासारख्या दिसणाऱ्या विचित्र परग्रहवासीयाचे छायाचित्र त्यांनी प्रकाशित केले आहे. यातील चेहऱ्याचा भाग सर्व बाजूनी योग्य असलल्याचा दावा वॉरींग यांनी केला. या कथित परग्रहवासीययाच्या चेहऱ्यावर नाक, कान, डोळे आणि कपाळ आहे.
मंगळावरील गीगापॅन छायाचित्रात ही आश्चर्यकारक बाजू मला आज आढळली आहे. त्यातील तपशील भन्नाट आहे. चेहऱ्यावर नाक, डोळे, कान आणि कपाळ यांचे अस्तीत्व ठामपणे आहे. जणू ही व्यक्ती उंचावरून सर्वांकडे लक्ष ठेवत आहे. मात्र काळानुसार ती पडलेलीआहे, असे वॉर्िरंग यांनी त्यांचे संकेत स्थळ इटी डाटाबेसवर म्हटले आहे.
मंगळावर खरंच परग्रहवासीयांचे अस्तित्व आहे का? हा प्रश्न करणाऱ्यांना हे छायाचित्र म्हणजे उत्तर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंगळावर परग्रहवासीय असल्याचा दावा वॉरींग यांनी काही पहिल्यांदाच केला नाही. यापुर्वी त्यांनी परग्रहवासीयांना हाडे असल्याच दावा काही महिन्यांपुर्वी केला होता.