मुंबई : राज्यात एकीकडे भारनियमन सुरु असताना दुसरीकडे ऊर्जा मंत्र्यांच्या नावाने एका भामट्याने अनेकांना गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. विद्युत विभागात सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने या भामट्याने लोकांची फसवणूक केली आहे. दरम्यान, या भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपण ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे नातेवाईक असल्याचे सांगत या तरुणाने लोकांची फसवणूक केली होती. आरोपीने नोकरी देण्याच्या बहाण्याने ११ जणांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai’s Dadar Police have registered a case against one Sandeep Raut for duping 11 people on the pretext of providing them govt jobs in the electricity department by posing as the nephew of Maharashtra Energy Minister Nitin Raut
— ANI (@ANI) May 6, 2022
संदीप राऊत असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबईतील दादर पोलिसांनी संदीप राऊत यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे नाव सांगत या आरोपीने लोकांची फसवणूक केल्याने संताप व्यक्त होत आहे. शिवाय आरोपी संदीपला राऊतला अटक करण्यात आली की नाही, यासंदर्भात माहिती समोर आलेली नाही.