पंजाब पोलिसांनी आज (शुक्रवारी) भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांना अटक केली आहे. पोलिसांनी बग्गा यांना दिल्लीतून अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईवर भाजप नेते कपिल मिश्रा यांनी आक्षेप घेतला आहे. बग्गा यांच्याविरोधात 1 एप्रिल रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर प्रक्षोभक विधाने करणे, शत्रुत्व वाढवणे आणि गुन्हेगारी धमकी देणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. द काश्मीर फाइल्स चित्रपटाच्या वक्तव्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बग्गा यांनी जोरदार टीका केली होती.
BJP leader Tajinder Pal Singh Bagga arrested by Punjab Police: Aam Aadmi Party MLA Naresh Balyan pic.twitter.com/ibrebvNCeU
— ANI (@ANI) May 6, 2022
मार्च महिन्यात, सीएम केजरीवाल यांनी विधानसभेत काश्मिरी पंडितांवर आधारीत चित्रपट, द काश्मीर फाईल्स करमुक्त न करण्याबाबत विधान केले होते, त्यावेळी बराच गदारोळ झाला होता. यावर बग्गा यांनी ट्विट करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केली होती. तत्पूर्वी, छत्तीसगडमध्येही बग्गा यांच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला होता, ज्यामध्ये बग्गा यांच्यावर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप होता.