बचत गट ही सक्षमीकरणाची चळवळ : रहाटकर

राबविणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य
प्रज्वल योजना प्रशिक्षण शिबिराचे उद्‌घाटन ः महिलांविषयक धोरण

पिंपरी  – राज्य महिला आयोग हे महिलांचे जीवनमान उंचवण्याचे काम करीत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठीचे कायदे शेवटच्या घटकापर्यत पोहचवायचे आहेत. महिलांचे बचत गट ही सक्षमीकरणाची खूप चांगली चळवळ आहे, असे प्रतिपादन महाराट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर
यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिका व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या वतीने महिला सक्षमीकरण अंतर्गंत आयोजित महिला बचत गटांसाठीच्या प्रज्वल योजना प्रशिक्षण शिबिराच्या उद्‌घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. आचार्य अत्रे रंगमंदिरात महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.23) झालेल्या या कार्यक्रमाला आमदार लक्ष्मण जगताप, आयुक्‍त श्रावण हर्डीकर, अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष पाटील, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, नगरसेविका अश्‍विनी बोबडे, उषा मुंढे, शर्मिला बाबर, यशोदा बोईनवाड, सुवर्णा बुर्डे, योगिता नागरगोजे आदी उपस्थित होते. यावेळी रहाटकर म्हणाल्या, महिलांविषयक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे, प्रज्वल योजनेत महिलांविषयक कायदे व बचत गटाच्या योजनांची माहिती दिली जाते. याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचत आहे.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, सर्व क्षेत्रात महिला सक्षम झाल्या पाहिजेत आज महापालिकेच्या माध्यमातून बचत गटांना विविध घरगुती व्यवसायासाठी अर्थसहाय्य केले जाते. यामुळे गरीब कुटुंबांचे जीवनमान उंचावते. महापौर राहुल जाधव म्हणाले, पवनाथडीच्या माध्यमातून महिलांनी उत्पादित केलेल्या मालास योग्य बाजारपेठ मिळावी, म्हणून स्टॉल्स उभारून प्रोत्साहन दिले जाते. शलाका साळवी व मीनल मोहाडीकर यांनी महिलांविषयक योजना व कायदे याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन बी.के.कोकाटे यांनी तर आभार सहाय्यक आयुक्‍त स्मिता झगडे यांनी व्यक्‍त केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)