प्रिटोरिया : दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये रंगणा-या चार सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यास आजपासून सुरूवात होणार आहे. आफ्रिकेतील सेंचुरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर हा सामना रंगणार असून भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सामन्यास सुरूवात होईल.
Hello Boxing Day! It’s an absolutely stunning day at SuperSport Park & we anticipate a cracker of a game as #ProteaFire take on England in the first Test match of the summer. Play starts at 10am, but catch the build up live on SuperSport 2 & SABC 3 from 9:30. #SAvENG pic.twitter.com/jBoqKWUgFm
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 26, 2019
भारत दौ-यातील कसोटी मालिकेत आफ्रिकेला ३-० ने मालिका पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर प्रथमच आफ्रिकेचा संघ मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे.
जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेत समाविष्ट असलेल्या या मालिकेची सुरूवात विजयाने करून दक्षिण आफ्रिका क्रिकेटसाठी फारसे चांगले न गेलेल्या या वर्षाचा शेवट तरी गोड करावा, असा यजमान दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल.