नवी दिल्ली : भारत विरूध्द श्रीलंका याच्यांत येत्या ७ जानेवारी रोजी होणा-या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेने (एमपीसीए) कमीत कमी ५०० रूपयात तिकिट उपलब्ध केले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना अत्यंत कमी पैशांत सामना पाहण्याची पर्वणी मिळणार आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी सहापासून आॅनलाइन तिकिटविक्री सुरू झाली आहे. मध्य प्रदेशातील होळकर मैदानावर ७ जानेवारी रोजी हा सामना खेळवण्यात येणार असून स्टेडियमची आसनक्षमता २७,००० इतकी आहे.
भारताची श्रीलंकेविरूध्द तीन टी-२० सामन्यांची मालिका ५ जानेवारीपासून सुरू होईल, यामध्ये पहिला सामना ५ जानेवारीला (गुवाहटी), दुसरा सामना ७ जानेवारीला (इंदूर) तर तिसरा सामना १० जानेवारीला (पुणे) होईल.
#INDvSL टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर.