कोरेगाव – 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताने मिळवलेल्या नेत्रदीपक विजयाबद्दल कोरेगाव येथे रयत शिक्षण संस्थेच्या डी. पी. भोसले कॉलेजमध्ये विजय दिन समारंभ शनिवारी (दि. 16) उत्साहात साजरा करण्यात आला.
वीर जवानांच्या कुटुंबांतील सदस्यांनी आणि मान्यवरांनी अमर जवान स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून, अभिवादन केले. यावेळी देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती.
महाविद्यालय विकास समितीचे निमंत्रित सदस्य प्राचार्य अरुण बर्गे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बाळासाहेब चव्हाण अध्यक्षस्थानी होते.
राष्ट्रीय छात्रसेनेच्या सातारा येथील 11 महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार मेजर सतीश तपसी, निवृत्त कॅप्टन महादेव भोसले, निवृत्त सुभेदार अशोक नलवडे, माजी विद्यार्थी सी. आर. बर्गे, पांडुरंग बर्गे, दीपक देवरे उपस्थित होते. राष्ट्रीय छात्रसेना विभागाचे प्रमुख कॅप्टन बाळकृष्ण भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. सनी मोरे यांनी आभार मानले