फलटण, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य दूध महासंघ महानंदाचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक डी. के .पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. २५ रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीराचे उद्घाटन सकाळी ९ वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर पिंपळवाडी येथे आ. दीपकराव चव्हाण व जि. प. चे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात होणार आहे. यावेळी मार्केट कमिटीचे चेअरमन रघूनाथराजे नाईक-निंबाळकर, भैरवनाथ उद्योग समूहाचे सर्व्हेसर्वा बाळासाहेब कासार, दत्त इंङियाचे अजितराव जगताप ,
जि. प. सदस्य दत्तात्रेय अनपट, सुभाष गायकवाड, माजी सभापती शंकरराव माडकर व सौ रेश्मा भोसले, साखरवाडीचे सरपंच विक्रम आप्पा भोसले, उपसरपंच समीर भोसले, श्रीराम कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन भोसले, फलटण दूध संघाचे व्हॉइस चेअरमन दत्तोबा रणवरे व संचालक सुरेश रोमन, पिंपळवाडी यात्रा कमिटीचे अध्यक्ष जयराम भोसले, सचिव राजेंद्र भोसले, महादेव बोंद्रे, अतुल सरक,
शंकरराव बर्गे, ह. भ. प. प्रकाश पवार महाराज, अभय निंबाळकर, अर्जुनराव कापसे, मनोज भोसले, तुकाराम पवार, अरुण गायकवाड, रवी जगताप, दादासाहेब चव्हाण, तुषार निंबाळकर, राहुल पवार, होळ विकास सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत भोसले, व्हाईस चेअरमन चंद्रकांत जाडकर ,
मातोश्री सोसायटीचे व्हाईस चेअरमन संजय. प .भोसले राजेंद्र पवार , तंटामुक्ती कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप बाबा पवार, खामगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच गणपत बोडरे, हिंदुराव वारे माजी सरपंच खराडवाडी टिळेकर सर माजी उपसरपंच खामगाव पवार सर, भाडळी सरपंच वसंतराव मुळीक महागडे सर, माजी सरपंच सुरेश दादा भोसले, विलास गंगावणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.