पुणे: कोव्हिड-१९ च्या कठीण परिस्थितीत उत्तम कामगिरी केल्याबद्दल आरोग्य मंत्रालय, सिंगापूर यांनी विराज राजेन्द्र यादव यांना पदक देऊन नुकतेच सन्मानित केले आहे.
सिंगापूर येथील प्रतिष्ठित रॅफल्स हॉस्पिटल येथे माहिती व तंत्रज्ञान विभागात ते वरिष्ठ कार्यकारी अधिकारी असून कोव्हिडच्या कठीण कालखंडात कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यापूर्वीही सिंगापूर शासनाकडून पुण्यातील टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर येथे प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली होती.
विराज यादव मुळचे पुण्यातील असून पुणे विद्यापिठातून इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर उच्च शिक्षण त्यांनी सिंगापूर येथे घेतले.