Chhattisgarh Factory Blast| डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मधील अमुदान केमीकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात आठ कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी या कंपनीत बाॅयलरचा स्फोट झाला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की, परिसरातील दोन किमी अंतरावरील जमीन हादरली.
काही घरांच्या आणि रस्त्यावरील गाड्यांच्या काचा फुटल्याचीही माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत जवळपास 50 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. डोंबिवलीतील हे प्रकरण ताजे असतानाच आता छत्तीसगडमध्ये आज सकाळी एका गनपावडर कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. Chhattisgarh Factory Blast|
बेमेतरामधील बोरसी गावातील एका कारखान्यात हा स्फोट झाल्याची माहिती आहे. कारखान्यात झालेल्या स्फोटात 8 ते 10 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अनेक कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचं सांगितलं जात आहे. मात्र स्फोट झाला त्यावेळी मोठ्या प्रमाणात कामगार कारखान्यात उपस्थित होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढू होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.
या घटनाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तसेच आजुबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Chhattisgarh Factory Blast|
बेमेतरा जिले के बोरसी गांव के बारूद फैक्ट्री में ब्लास्ट होने की दुःखद खबर आई है।
घटना की जानकारी मिलते ही उच्चाधिकारियों को आवश्यक निर्देश दे दिए गए हैं। राहत एवं बचाव कार्य युद्धस्तर पर जारी है। जिसकी सतत निगरानी की जा रही है।
— Vishnu Deo Sai (Modi Ka Parivar) (@vishnudsai) May 25, 2024
बेमेतरा घटनेवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी ट्वीटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. “बेमेतरा जिल्ह्यातील बोरसी गावातील गनपावडर कारखान्यात स्फोट झाल्याची दुःखद बातमी आली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे, ज्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्याकडून देण्यात आली आहे. Chhattisgarh Factory Blast|
हेही वाचा:
प्रतिक्षा संपली! अखेर दहावीच्या निकालाची तारीख जाहीर