खटाव – विकासकामांच्या निधीबाबत अजिबात कमतरता भासू देणार नाही. सध्याच्या संरक्षक भिंतीच्या कामासाठी पंधरा लाख रुपये निधी उपलब्ध केला आहेच. शिवाय काही दिवसांत अजून पंधरा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. दर्ग्यावरील सभामंडपाचे काम देखील लवकर सुरु केले जाईल. तसेच कामाच्या दर्जाबाबत देखील कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे आमदार महेश शिंदे यांनी स्पष्ट केले.
येथील मुस्लिम समाजाच्या काझी दफन भूमी येथे आमदार महेश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून व युवा नेते राहुल पाटील यांच्या माध्यमातून कब्रस्तानच्या संरक्षक भिंतींच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी युवा नेते राहुल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोकराव कुदळे, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच राहुल जमदाडे, अमर देशमुख व ग्रामपंचायत सदस्य, दादासो मोहिते, दीपक विधाते, राहुल शिंदे, किसन मोरे, शरद बोबडे, केशव धुमाळ, मुसा काझी, मैनुद्दीन काझी, आलम काझी, जमीर काझी, लियाकत काझी, नाजीम काझी, जीम काझी, शब्बीर काझी, मन्सूर काझी, चॉंदसाब मुल्ला, तौफिक संदे आदी मुस्लिम बांधव, सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.