सातारा – जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित स्व. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या मोरावळे (ता. जावळी) शाळेने चमकदार कामगिरी केली. आराध्या संतोष साळुंखे हिने २२ किलाे वजनी गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.
जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित स्व. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत याच क्रीडा प्रकारात शाळेतील निशा सचिन जाधव हिने तालक्यात प्रथम तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. पायल संतोष साळुंखे व अथर्व सचिन केंजळे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना क्रीडा शिक्षक लहुराज जाधव, लता साळुंखे, सविता जांभळे यांचे मार्गदर्शन मिळाले. विजेत्या विद्यार्थ्यांची मोरावळे ग्रामस्थांनी गावातून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.
स्पर्धेतील यशाबद्दल स्पर्धक, मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल, चंदकांत कर्णे, केंद्रप्रमुख अरविंद दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सरपंच, सदस्य, पालक, ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.