सातारा – राज्य धनुर्विद्या संघटनेअंतर्गत हिंगोली जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटना स्पर्धा २०२४ मध्ये श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, पानमळेवाडी (वर्ये) सातारा येथील खेळाडू अर्णव अमित शिंदे (रा. लिंब, ता. सातारा) याने रौप्यपदक प्राप्त केले.
हिंगोली येथे दि. २८ ते ३०जानेवारी दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत अर्णव शिंदेनी दिमाखदार कामगिरी करत उज्ज्वल यश संपादन केले. क्रीडा शिक्षक उदय ननावरे, वर्गशिक्षक ऋषिकेश भोसले यांचे त्यास मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल अर्णव याचे खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक दत्तात्रय नलावडे, सचिव गणेश नलवडे, उपाध्यक्ष हनुमंत जगताप, कार्यकारी संचालक सुगंध सोनवणे, मुख्याध्यापक मंगेश शेलार आदींनी अभिनंदन केले.