सातारा – सातारा- जावळी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नूतन पदाधिकारीच्या निवडी सोमवारी करण्यात आल्या. जावळी तालुकाध्यक्ष पदी साधू चिकणे, सातारा तालुकाध्यक्षपदी शशिकांत वाईकर तर सातारा शहराध्यक्षपदी बाळासाहेब बाबर यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेनुसार व जिल्हयाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर आ. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांच्या नेतृवाखाली सातारा-जावळी विधान सभा मतदार संघातील नूतन पदाधिकारी निवडी करण्यात आल्या.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातारा शहराध्यक्षपदी बाळासाहेब बाबर, सातारा तालुकाध्यक्षपदी शशिकांत वाईकर व जावळी तालुकाध्यक्षपदी साधू चिकणे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. पक्षाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सौ.संगीता देशमुख, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष पदावर शमशुद्दीन सय्यद (कोंडवे) तसेच ओ.बी.सी.विभाग शहराध्यक्षपदी श्री. बनकर, सातारा-जावळी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र पांडुरंग शेलार व कार्याध्यक्ष म्हणून महेश पाटील, सातारा जिल्हा चिटणीसपदी प्रकाश कदम यांच्या निवडी करण्यात आल्या.
या निवडीप्रसंगी जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, जावली सहकारी बँक संचालक योगेश गोळे, प्रकाश कोकरे, अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, सौ. वैशाली सुतार, संदीप भोसले व इतर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.