वडूज – खेड्यापाड्यातून येऊन कातरखटावमधील चौकात आणि ग्रामपंचायत हद्दीत उठसूठ फ्लेक्स बोर्ड लावण्यावर ग्रामपंचायतीने प्रतिबंध घातले आहेत. गावात लावलेले फ्लेक्स बोर्ड ग्रामपंचायतीने हटवले. परवानगीशिवाय फ्लेक्स बोर्ड लावता येणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे.
कातरखटाव ग्रामपंचायत हद्दीत आणि चौकात फ्लेक्स बोर्डचे पेव दिवसेंदिवस वाढत चालले होते. कोणीही यावे आणि गावात फ्लेक्स बोर्ड लावावेत, अशी स्थिती होती. चमकोगिरी करणार्यांच्या फलकांची संख्या वाढत असल्याने टपरीधारक, व्यापारी, व्यावसायिकांना आणि वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा होता. त्यामुळे अनधिकृत फ्लेक्स बोर्ड हटवण्यात आले. परवानगी घेतल्याशिवाय फ्लेक्स बोर्ड लावता येणार नाहीत, अशी ठाम भूमिका ग्रामपंचायतीने घेतली आहे.