फलटण – अयोध्या येथील राम मंदिरात दि. 22 रोजी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. प्रभू श्रीराम हे फलटणचे आराध्यदैवत आहे.
या पार्श्वभूमीवर रविवार, दि. 14 रोजी सकाळी 7 वाजता फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात रामनाम जप आणि रामरक्षा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या रामभक्तांनी कागदावर 108 वेळा ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा जप लिहून, त्या खाली स्वतःचे संपूर्ण नाव व पत्ता लिहायचा आहे. अयोध्येत होणार्या समारंभापूर्वी रामनाम जपाचे रामकुंड तेथे पाठवण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले