सातारा – सातारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहने चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. मात्र शाहूपुरी पोलिसांना आज वाहनचोर टोळीस अटक करण्यात यश आले आहे. विकास मुरलीधर मुळे (मंगळवार पेठ सातारा) बाळा उर्फ सुरज किसन सकटे (रा. कोरेगाव जि.सातारा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीकडून शहर परिसरामध्ये वाहनचोरी गुन्हे केल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यांच्याकडून एक लाख ६३ हजार रुपये किंमतीच्या नऊ दुचाकी व एक मोबाइल जप्त करण्यात आला आहे.