मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी आज शिवबंधन हातात बांधले आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी सोडताना दुःख होत आहे. परंतु, काही वेळेस कठोर निर्णय घ्यावे लागतात, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली आहे.
सचिन अहिर म्हणाले कि, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत आलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करणार नाही, शिवसेना पक्ष वाढवण्याचा काम करणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.
Maharashtra: Mumbai NCP president Sachin Ahir, joins Shiv Sena in the presence of party chief Uddhav Thackeray. pic.twitter.com/LWcP5SgUL5
— ANI (@ANI) July 25, 2019
दरम्यान, सचिन अहिर हे शिवेसनेत प्रवेश करणार ही अफवा असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले होते. मात्र, सचिन अहिर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी तो मोठा धक्का मानला जातो आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष श्री. @AhirsachinAhir यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे आणि युवासेनाप्रमुख @AUThackeray यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/mhK2PWquVZ
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) July 25, 2019