सातारा -क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या लॅबमध्ये दोन महिन्यांत आजपर्यंत 20 हजार 236 एवढ्या करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात 7614 एवढे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर 11हजार 432 जण निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर लॅब 11 ऑगस्ट रोजी सुरु करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत अविरत काम सुरु असून यासाठी 12 तंत्रज्ञ, 2 डॉक्टर, 2 डेटा ऑपरेटर आणि तीन कार्यालयीन सहाय्यक काम करीतत आहेत. आजपर्यंत फक्त 374 नमुने बाद झाले आणि 811 नमुने अनिर्णित राहिले असल्याची माहिती डॉ. सारिका बडे, डॉ. तेजस्विनी पाटील, डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी दिली.