सातारा – अकोला येथे झालेल्या 67 व्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील यासर मुलाणी व सैफअली झारी, साई बल्लाळ यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड,पंजाब, हरियाणातील खेळाडूंना पराभूत करत नाव सुवर्णपदके पटकावली.
या दोघांनीही सातारा जिल्हा मध्ये व एल.बी.एस. कॉलेजमध्ये इतिहास निर्माण केला आहे. कष्टाची खूप पराकष्टा करीत शासकीय शालेय स्पर्धा 2023-24 या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. या खेळाडूंचा प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यांना प्रा.मेजर मोहन वीरकर, डॉ. विकास जाधव, प्रा. शिरीष ननावरे, प्रकाश महाडिक, राजेंद्र होले, व मानद प्रशिक्षक सागर जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या सौ. शुभांगी गावडे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक तवर, ज्युनिअर विभाग प्रमुख सौ. व्ही. एस.शिंदे व प्रा. सुनील शिंदे, बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे व राजेंद्र मुंदडा व सायन्स विभागातील सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.