कराड – शहर व परिसरात दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख 10 हजार रूपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या. नितीन तुकाराम बसनूर (वय 26, रा. येणपे, ता. कराड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कराड शहर व परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपअधीक्षक अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार तांत्रिक माहिती तसेच बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालताना नितीन बसनूर याला अटक केली. त्याच्याकडून तीन गुन्ह्यातील दुचाकी हस्तगत केल्या आहेत. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केली.