सातारा – छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील उभारण्यात आलेल्या सुसज्ज कोविड हॉस्पिटलचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 9) दुपारी दोन वाजता ऑनलाइन उदघाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर असणार आहेत.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आ. शशिकांत शिंदे, आ. मोहनराव कदम, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, आ. मकरंद पाटील, आ.दीपक चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.
या हॉस्पिटलमध्ये 234 ऑक्सिजन बेड व 52 आयसीयू बेड आहेत. रुग्णालये घेत नाहीत अशा डायलिसीसच्या रुग्णांसाठीही चार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांची तपासणी करुन या रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.