पुणे – नृत्य कलावंत तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर भागातील गोंधळेनगर भागात मंगळवारी सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
अपघातानंतर आलेल्या नैराश्यातून तीने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.
विशाखा काळे (वय 24, रा. हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. विशाखा या नृत्यकलावंत होत्या. त्या आई-वडिल आणि बहिणीसह गोंधळेनगर भागात राहात होत्या.
विशाखा आणि त्यांची बहिण इव्हेंट मॅनेजमेंट आणि नृत्याचे कार्यक्रम करीत असत. दरम्यान, विशाखा यांचा गतवर्षी नोंव्हेंबर महिन्यात अपघात झाला आणि त्यानंतर चेहऱ्याला मार लागल्यामुळे त्यांना कार्यक्रमात सहभागी होता येत नव्हते. त्यामुळे त्या मागील काही महिन्यांपासून नैराश्यात होत्या.
दरम्यान, विशाखा यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी (दि. 6 ऑक्टोबर) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तिच्या कुटुंबियांना तीने आत्महत्या केल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती कुटुंबियांनी हडपसर पोलिसांना दिली.